एअरटेल युजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. एअरटेल युजर्सचा डेटा हॅक करुन तो विकला जात आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र, एअरटेलने या सर्व गोष्टी नाकारल्या आहेत. एअरटेलने आपल्या निवेदनात कोणाचाही डेटा हॅक न झाल्याचे म्हटले आहे.
हॅक झालेल्या डेटामध्ये युजर्सचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, कुटुंबाची माहिती, आधार कार्डची माहिती या गोष्टींचा समावेश आहे, असं सांगण्यात आलं होते. एका सोशल मिडिया पोस्टद्वारे ही माहिती देण्यात आली होती.
त्या पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, xenZen एअरटेल युजर्सचा डेटा अनधिकृतपणे विकत आहे. ही डेटा डार्क वेबवर विकला जात आहे. ब्रीजफोरम नावाच्या समुदायामध्ये हा डेटा विकला जात आहे.जवळपास ३७५ मिलियन युजर्सचा डेटा हॅक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
या माहितीत असा दावा केला जात आहे की, जून २०२४ मध्ये हा डेटा लीक झाला आहे. या माहितीत युजर्सची सर्व वैयक्तिक माहितीचा समावेश आहे.
एअरटेलने या ब्रीचचे वृत्त फेटाळले आहे. एअरटेलने सांगितले की, प्रारंभिक तपासणीच्या आधारे एअरटेलच्या सिस्टीममध्ये कोणताही डेटा चोरीला गेलेला नाही.