घरात वाय-फाय समस्या? अहो, मग एअरटेलची 'ही' सेवा जाणून घ्या ; फक्त ९९ रुपयांमध्ये
घरात वाय-फाय समस्या? अहो, मग एअरटेलची 'ही' सेवा जाणून घ्या ; फक्त ९९ रुपयांमध्ये
img
वैष्णवी सांगळे
एअरटेलने भारतीय ग्राहकांसाठी खास सेवा लॉन्च केली आहे.  घरभर वाय-फाय समस्या सोडवण्यासाठी 'एअरटेल कव्हरेज+ वाय-फाय एक्स्टेंडर' हे उत्पादन ९९ रुपयांमध्ये सादर केले आहे. हे उपकरण मोठे घर असलेल्यांसाठी, स्मार्ट उपकरणांचा वापर करणाऱ्यांसाठी आणि सातत्याने ऑनलाइन स्ट्रीमिंग करणाऱ्यांसाठी एक  उत्तम उपाय आहे, कारण ते जलद आणि विश्वासार्ह इंटरनेट सिग्नल संपूर्ण घरात पोहोचवते. 

एअरटेल कव्हरेज+ वाय-फाय एक्स्टेंडरचे फायदे: 

परवडणारी किंमत : हे उपकरण फक्त ९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

सतत ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी फायदेशीर :सतत व्हिडिओ पाहणाऱ्यांसाठी आणि ऑनलाइन कंटेंटचा आनंद घेण्यासाठी हे उपकरण खूप उपयुक्त आहे.

संपूर्ण घरात स्पीड : यामुळे वाय-फायचे सिग्नल संपूर्ण घरात पोहोचतात त्यामुळे घराच्या कुठल्याही कोपऱ्यात आणि कुठेही स्पीड कमी होत नाही.

स्मार्ट डिव्हाइसेससाठी उपयुक्त : जर तुम्ही अनेक स्मार्ट उपकरणे वापरत असाल तर त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. म्हणजेच हे जवळपास ६० उपकरणांशी जसे कि स्मार्ट टीव्ही , आयओटी डिव्हाईस सहज वापरता येतात. आणि तितकेच सहज कनेक्ट होतात. 

थोडक्यात, जर तुम्हाला तुमच्या घरात वाय-फाय सिग्नल कमी येत असेल आणि तुम्हाला घरभर हाय-स्पीड इंटरनेट हवे असेल, तर एअरटेल कव्हरेज+ वाय-फाय एक्स्टेंडर हा ९९ रुपयांतील एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. 
WiFi | airtel |
इतर बातम्या
Join Whatsapp Group