नाशिक (प्रतिनिधी) :- वायफाय वापरण्याच्या कारणाने घरात येऊन महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी चैतन्य हर्षल कुलकर्णी (रा. सिडको) हा दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात वायफाय वापरण्याच्या बहाण्याने आला.
त्यावेळी आरोपी कुलकर्णी याने स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार आरोपी चैतन्य कुलकर्णीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार महाजन करीत आहेत.