एअरटेलच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी , कंपनीकडून
एअरटेलच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी , कंपनीकडून "ही" नवीन प्रणाली सुरू ; असा होणार फायदा
img
Dipali Ghadwaje
देशभरात डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे ऑनलाइन फसवणुकीचा धोका देखील वाढला आहे. यामुळे वापरकर्त्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. ओटीपी फ्रॉड आणि स्कॅमर्सचे कॉल खूप वाढले आहेत. अशातच  जर तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांना सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली प्रत्येक ॲपवर लक्ष ठेवेल आणि कुठेही संशयास्पद हालचाल आढळल्यास वापरकर्त्याला त्वरित सतर्क करेल.


एअरटेलने १५ मे २०२५ रोजी हे नवीन आणि आधुनिक सुरक्षा समाधान लाँच केले आहे. या प्रणालीद्वारे ईमेल, ब्राउझर, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम, एसएमएस आणि इतर सर्व ओव्हर-द-टॉप (ओटीटी) ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर सतत लक्ष ठेवले जाईल. हे सोल्यूशन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहे की ते आपोआप फ्रॉड आणि स्पॅम शोधून काढेल आणि त्यांना त्वरित ब्लॉक करेल, ज्यामुळे वापरकर्त्यांचे संभाव्य आर्थिक नुकसान टळेल.

एअरटेलची ही सेवा पूर्णपणे मोफत असणार आहे आणि यासाठी वापरकर्त्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. सर्व एअरटेल मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी हे सोल्यूशन इंटिग्रेटेड असल्यामुळे ते आपोआप सक्रिय होईल.

त्यामुळे, जर एअरटेलचा कोणताही ग्राहक आपल्या मोबाईलवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर एखादी धोकादायक वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न करत असेल, तर एअरटेलची ही फ्रॉड डिटेक्शन प्रणाली ते पेज ब्लॉक करेल. यासोबतच, एअरटेल आपल्या वापरकर्त्याला असे करण्यामागचे नेमके कारण देखील स्पष्टपणे सांगणार आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना धोक्याची जाणीव होईल.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group