परतव्याची ठोस हमी हवी असेल तर सरकारच्या वेगवेगळ्या योजनांत गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. सरकारच्या अशा काही अनेक योजना आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही भरघोस पैसे मिळवू शकता. विशेष म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना असतात. सरकारच्या अनेक योजनांमध्ये महिलांना भरघोस परतावा मिळत आहे, या योजनांत गुंतवणूक केल्यास तोटा होण्याचा धोका नसतो. भारत सरकारने खास महिलांसाठी अशीच एक योजना लागू केली आहे.
सरकारने महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला भरघोस परतावा मिळेल. या योजनेत महिला गुंतवणूक करु शकतात. या योजनेत पालक आपल्या मुलींसाठीदेखील खाते उघडू शकतात.
महिलांनी आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक करावी यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे. ही योजना २०२३ मध्ये सुरु करण्यात आली आहे. २०२३ ते २०२५ या दोन वर्षांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेवर वार्षिक ७.५ टक्के व्याज मिळते. या योजनेवरील गुंतवणूकीवर आयकर कायदा 80C अंतर्गत सूट मिळते. परंतु योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. म्हणजे व्याज उत्पन्नावर टीडीएस कापला जाईल. या योजनेतील व्याज दर तिमाहित तुमच्या अकाउंटमध्ये जमा होते.