बचत गटांसाठी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय ; वाचा सविस्तर
बचत गटांसाठी सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय ; वाचा सविस्तर
img
Dipali Ghadwaje
राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या आर्थिक समृद्धीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात किंवा लाभाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांच्या माध्यमातून संबंधित घटकांना सामाजिक आणि आर्थिक स्थिरता प्राप्त होते व आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी अशा योजनांचा किंवा निर्णयांचा खूप मोठा फायदा होतो. याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनातून देखील शासनाचे अनेक निर्णय फायद्याचे ठरतात.

ग्रामीण भागाचा विचार केला तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये महिलांच्या आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून बचत गट व त्यांचे योगदान खूप महत्त्वाचे असून अनेक महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण झालेले आहेत.

महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या उत्पादने  उत्पादित केले जातात. परंतु बऱ्याचदा महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते.

परंतु आता महिला बचत गटांच्या उत्पादनाच्या विक्रीच्या बाबतीत बाजारपेठेची जी काही समस्या होती ती आता जवळपास मिटणार असून राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाकडून महिला बचत गटांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार उत्पादनांना आता हक्काची बाजारपेठ मिळणार आहे.

 राज्य शासनाने महिला बचत गटांसाठी सुरू केले यशस्विनी ई–कॉमर्स प्लॅटफॉर्म

महिला बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी याकरिता राज्याच्या महिला व बालकल्याण विकास विभागाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आले असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी त्याचे उद्घाटन केले.

ज्याप्रमाणे सध्या ऑनलाईन शॉपिंग अनेक ऑनलाईन प्लेटफॉर्मच्या सहाय्याने केली जाते. अगदी त्याच पद्धतीने आता महिला बचत गटांच्या उत्पादनांची देखील विक्री आणि खरेदी यशस्वी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होणार आहे व त्याचा नक्कीच फायदा महिला बचत गटांना होईल.

 महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?

यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले की, भारतामधील रिटेल क्षेत्रात ऑनलाइन शॉपिंग खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे व सध्या कोटी रुपयांची देवाणघेवाण या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मच्या मदतीने केली जाते. अगदी त्याच पद्धतीने आता महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी याकरिता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

त्यामुळे आता ग्रामीण तसेच शहरी भागातील बचत गट जे काही नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने बनवतील ते आता या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होतील व महिला बचत गटांना  मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि आर्थिक उन्नतीचे मार्ग सुकर होतील.

 यासाठी काय करावे लागेल बचत गटांना?

यामध्ये बचत गटांना या प्लॅटफॉर्मच्या मदतीने खरेदी-विक्री करता यावे याकरिता नाव नोंदणी करणे गरजेचे राहील. त्यानंतर बचत गटांचे जे काही उत्पादन असेल त्याचे फोटो अपलोड करणे महत्त्वाचे आहे व ते या माध्यमातून करता येणार आहेत. तसेच बचत गटांना त्यांच्या उत्पादनाच्या किमती व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

 यशस्विनी ई प्लॅटफॉर्मच्या मदतीने कसा होईल व्यवहार?

महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनाची वाहतूक तसेच पॅकिंग, उत्पादनांची साठवणूक करणे तसेच योग्य प्रकारे हाताळणी इत्यादीची माहिती देखील यामध्ये देण्यात आली असून

या प्लॅटफॉर्मच्या मदतीने बचत गटांच्या उत्पादनाची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये ऑनलाइन रक्कम जमा होण्याची देखील व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group