सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोनं-चांदीच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आज सोनं-चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
सोन्याचे दर आता नेमके किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी तब्बल ८७५५ रुपयांची घट नोंदवली गेल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५१ हजार ४१० रुपयांपर्यंत घसरले होते. तर शुक्रवारी १०३० रुपयांची वाढ नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५२ हजार ४४० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३८११ रुपयांची घट नोंदवली. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ४८ हजार ६२९ रुपयांपर्यंत घसरले.
चांदीचे दर आता नेमके किती?
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गुरुवारी तब्बल २३ हजार ६९० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ३८ हजार ९६० रुपयांपर्यंत घसरले होते. तर शुक्रवारी दिवसभरात ६१८० रुपयांची वाढ झाल्याने दर जीएसटीसही प्रति किलो दोन लाख ४५ हजार १४० रुपयांपर्यंत पोहचले होते. मात्र, शनिवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ७२१० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ३७ हजार ९३० रुपयांपर्यंत घसरले.