नवी दिल्ली : एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि महिन्याच्या सुरुवातीलाच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली आहे. सर्वात महत्त्वाच्या मौल्यवान धातूंमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असून जबरदस्त तेजीच्या काळात सोन्याने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात नव्या ऐकतिहासिक उच्चांकावर केली आहे.
आज, १ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीने सर्वकालीन नवीन उच्चांकावर उडी घेतली. सोन्याची वायदे किंमत ६९,४८७ रुपयांच्या नवीन ऑल-टाइम उच्चांकावर पोहोचली आहे. तर चांदीचे वायदेही महागले असून आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या वायदा किमतींनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत.सोन्याच्या दराने आता विक्रमी उच्चांक गाठला आहे.
सोमवारी, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या दिवशी, सोन्याच्या फ्युचर्स किंमतीने आज नवीन विक्रम नोंदवला, तर चांदीची वायदे किमतीतही वाढ होताना दिसत आहे.
सोन्याच्या फ्युचर्स किमती सर्वोच्च शिखरावर
सोन्याच्या वायदा किमतींनी आज नवा उच्चांक गाठला आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा एप्रिल वायदा आज १,०२२ रुपये वाढीसह ६८,६९९ रुपयांवर उघडला. तर बाजार उघडताच MCX वर सोन्याच्या किमतीत वाढ झाली आणि ट्रेडिंगच्या अल्पावधीतच नवीन विक्रमी पातळी गाठली. इंट्राडेमध्ये MCX वर एप्रिल सोन्याचा वायदा ६९,४८७ रुपये प्रति १० ग्रॅम या पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, जून फ्युचर्स किंमत ६८,७१९ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
चांदीची चमकही वाढली
सोन्यापाठोपाठ चांदीचे वायदेही तेजीत धावत आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यापार दिवशी MCX वर चांदीचे मे फ्युचर्स ४०२ रुपयांनी वाढले आणि ७५,४५० रुपयांवर पोहोचले तर सध्या ६२२ रुपये वाढीसह ७५,६७० रुपयांवर व्यवहार करत होता.