सराफा बाजारात मोठा उलटफेर !  आजचे सोन्याचे दर किती ?
सराफा बाजारात मोठा उलटफेर ! आजचे सोन्याचे दर किती ?
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढ उतार होत असून आता पुन्हा एकदा नवी अपडेट समोर आली आहे. 
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या मूल्यात वाढ झाली आहे. एका दिवसाच्या घसरणीनंतर, आज 10 जून रोजी सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झालेली दिसून आली.

गेल्या दोन दिवसांत 24 -कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 1480 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरात 1360 रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी, 8 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1040 रुपयांनी आणि 22-कॅरेट सोन्याचे दर 950 रुपयांनी कमी झाले होते. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. 10 जून रोजी देशाची राजधानी दिल्लीत 24-कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 10 रुपयांनी, तर 22-कॅरेट सोन्याच्या दरातही 10 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा विचार करता, एका दिवसाच्या स्थिरतेनंतर आज तिच्या दरात घट झाली असून, प्रति किलो चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आह

सोन्यानंतर दुसरा मौल्यवान धातू चांदीच्या दरांबाबत बोलायचं झालं तर, एका दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदीच्या दरात घट झाली आहे. यापूर्वी, 8 जून रोजी चांदीच्या दरात प्रति किलो 5000 रुपयांची घट झाली होती; तसेच 7 जून रोजी दर स्थिर राहण्याआधीच्या दोन दिवसांत त्यात 15 हजार रुपयांची कपात झाली होती. आज दिल्लीत चांदीचा दर प्रति किलो 100 रुपयांनी कमी होऊन 2,59,900 रुपये झाला आहे. मुंबई आणि कोलकाता यांसारख्या इतर प्रमुख महानगरांमध्येही याच दराने व्यवहार होत आहेत. मात्र, चेन्नईमध्ये चांदीचा दर प्रति किलो 2,69,900पये इतका असून, या चार प्रमुख महानगरांपैकी तेथे चांदी सर्वात महाग आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group