सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरामध्ये २ हजारांची वाढ झाली आहे. सोनं-चांदीचे दर वाढल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे.
त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 48 हजार 320 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख २७ हजार 840 रुपयांवर आले आहेत.