ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार; सोन्याच्या भावात वाढ सुरुच ; आज 1 तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या
ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार; सोन्याच्या भावात वाढ सुरुच ; आज 1 तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी झटका दिला. भावात मोठी वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाली होती. मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. आज (21 ऑगस्ट) सोन्याचा भाव तब्बल 550 रुपयांनी वाढला आहे. जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींमुळेही सोन्याच्या रोजच्या दरात चढ उतार होते. आता सणसमारंभ येऊ लागल्याने देखील मौल्यवान धातूच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसत आहे. 

सोने 500 रुपयांनी वधारले

गेल्या आठवड्यात सोन्याने मोठी भरारी घेतली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी किंमतीत कोणताही बदल झाला नाही. मंगळवारी सोन्याच्या दरात 120 रुपयांनी घसरण झाली. तर 21 ऑगस्ट रोजी बुधवारी सोने 550 रुपयांनी वधारले.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

 गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची झेप घेतली होती. तर या आठवड्यात सुरुवातीला चांदीत सुस्तावली होती. मंगळवारी चांदी 1,000 रुपयांनी वधारली. तर आज किंमतीत कोणताच बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार , 24 कॅरेट सोने 71,945, 23 कॅरेट 71,657, 22 कॅरेट सोने 65,902 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,959 रुपये, 14 कॅरेट सोने 42,088 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 85,321 रुपये इतका झाला.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group