दिल्लीतुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका ६ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे ज्या आरोपींनी हे संतापजनक कृत्य केले ते १० ते १४ वर्ष वयोगटातील आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर एक फरार आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दिल्लीतील भजनपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली. १० , १३ आणि १४ वर्षांच्या ३ मुलांनी ६ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. घटनेच्या काही तासांपूर्वी पीडित मुलीला तिच्या वडिलांनी चॉकलेट देऊन घराबाहेर सोडले होते. त्यानंतर त्याठिकाणी तिन्ही आरोपी आले त्यांनी मुलीला नूडल्स देण्याचे आमिष दाखवत सोबत नेले. आरोपींनी पीडित मुलीला एका बिल्डिंगमध्ये नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
आरोपींनी पीडित मुलीचे हात बांधून आणि तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत घरी आली. रक्त वाहत असल्यामुळे तिचे कुटुंबीय घाबरले. सुरूवातील तिच्या कुटुंबीयांनी शेजारच्यांना मुलगी पडल्याचे सांगितले. पण नंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या १३ वर्षांच्या मुलाने आपल्या दोन मित्रांसोबत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.
पीडित मुलीच्या आईने सांगितले की, जेव्हा माझी मुलगी बसते तेव्हा तिला प्रचंड वेदना होतात. जेव्हा ती खेळते तेव्हा रक्तस्राव होतो. आरोपी मुलं माझ्या मुलाचे मित्र आहेत. माझ्या १४ वर्षांच्या मुलीचा मागच्या वर्षी मृत्यू झाला होता ' या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही मुलांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं तर तिसऱ्याचा शोध घेत आहेत.