संतापजनक ! कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीला लोखंडी पक्कडीने चटके...
संतापजनक ! कीर्तनकार महाराजाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीला लोखंडी पक्कडीने चटके...
img
वैष्णवी सांगळे
अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. ढवळपुरी येथील श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणी कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका १७ वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

केवळ अत्याचारच नव्हे, तर पीडितेला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. 

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून आरोपीची तिच्यावर वाईट नजर होती. आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते, तर पीडितेचा भाऊ त्याच्याच संस्थेत कार्यरत होता. याच विश्वासाचा फायदा घेत नराधम यशवंतने २०२१ पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता 'मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, कोणाला सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन,' अशी धमकी देऊन त्याने तिला दहशतीत ठेवले होते. पीडिता घरी एकटी असली की आरोपी हा वारंवार बळजबरीने तिच्यावर अत्याचार करत असे.

यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ हा गेल्या पाच वर्षांपासून या मुलीवर अत्याचार करत होता. याबाबत मुलीच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अण्णासाहेब गुंजाळला पोलिसांनी रविवारी पहाटे चार वाजता बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने नराधम अण्णासाहेब गुंजाळला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवले. 

काही दिवसांपूर्वी या नराधमाने क्रूरतेचा कळस गाठला. पीडितेला फोन करून घरी बोलावले मात्र मुलीने येण्यास नकार दिला असता कुटुंबाल संपवण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये डांबले आणि बांबूने बेदम मारहाण केली. त्यानंतर गॅसवर लोखंडी पक्कड गरम करून तिच्या शरीरावर अमानुषपणे चटके दिले. या भीषण छळानंतरही त्याने तिच्यावर अत्याचार केला. 14 मार्च रोजी पीडितेच्या भावाने तिची गंभीर अवस्था पाहून तिला विश्वासात घेतले असता, पाच वर्षांपासून सुरू असलेला हा वेदनादायी आणि संतापजनक समोर आला.

बहीणीने हा धक्कादायक प्रकार सांगितल्यानंतर भावाने पोलीस स्थानकात धाव घेतली, पारनेर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी यशवंत थोरातला रविवारी पहाटे अटक केली. न्यायालयाने त्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा नराधम भोंदू महाराजाला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group