मुल होत नाही म्हणून सासऱ्याची सूनेला शरीरिक संबंधासाठी जबरदस्ती; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ
मुल होत नाही म्हणून सासऱ्याची सूनेला शरीरिक संबंधासाठी जबरदस्ती; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याकडून सुनेचा छळ
img
वैष्णवी सांगळे
पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. तीस वर्षीय विवाहित महिलेचं ३५ वर्षीय तरूणासोबत लग्न झाले होते. महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. मात्र, दोघांना अपत्य होत नव्हते. तरूण मूल होण्यासाठी सक्षम नसल्याचे कुटुंबियांना माहिती होते. मात्र, तरीही पीडित महिलेचे त्या पुरूषासोबत लग्न लावून दिले. पुरुष अक्षम असल्याने महिला गरोदर राहत नव्हती. 

नागपुरमध्ये खासदाराच्या कारचा भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

मात्र, यानंतर  निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त असलेल्या सासऱ्याची नियत फिरली. लग्नानंतर सासरे सुनेच्या खोलीत गेले. नंतर सुनेला, 'मुलाकडून तुला अपत्य होणं शक्य नाही. माझ्याकडूनच या गोष्टी कराव्या लागतील. माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव', असं त्यांनी सांगितलं.

नाशिक : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

या गोष्टीला सुनेनं नकार देत सासऱ्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. आणि पीडित महिलेनं थेट पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांसमोर आपबिती सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह त्यांची पत्नी आणि पीडितेच्या पतीविरोधात सहकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group