ग्रेड वाढवून देतो , 'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर', प्राध्यापकाने तरूणीला घरी नेलं, अन...
ग्रेड वाढवून देतो , 'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर', प्राध्यापकाने तरूणीला घरी नेलं, अन...
img
वैष्णवी सांगळे
शिक्षकच भक्षक झाल्याच्या अनेक घटना सध्या समोर येत आहे. अशातच बंगळुरूमधील एका खासगी विद्यापीठातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय प्राध्यापकाने  १९ वर्षीय पदवीधर विद्यार्थिनीला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. आणि तिच्यावर अत्याचार केले. 
विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर नराधमाला अटक केली असली तरी जामिनावर त्याला सोडण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्यार्थिनीने आरोप केला की, २५ सप्टेंबर रोजी प्राध्यपकाने तिला जेवणाच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. सुरूवातीला तिनं घरी येण्यास नकार दिला होता. परंतु, प्राध्यपकांनी वारंवार विनंती केल्यानंतर आणि आईला माहिती दिल्यानंतर तिनं घरी जेवण करण्यास होकार दिला. प्राध्यापकाने तिच्या आईला सांगितले की, त्याची पत्नी आणि मुले घरी असतील. तुमची मुलगी घरी सुरक्षित असेल, असं त्यांनी सांगितलं. 

तरूणी जेव्हा अपार्टमेंटमध्ये गेली, तेव्हा प्राध्यपकाने घरी कुणीच नसल्याचं सांगितलं. 'पत्नी आणि मुले घरी नाहीत. पुढील महिन्यात परत येतील', असं प्राध्यापकाने सांगितले. तेव्हा विद्यार्थिनीने घरी येण्यास नकार दिला. तेव्हा प्राध्यापकाने तिला विश्वासात घेऊन, महत्वाच्या बाबींवर चर्चा करू, असे सांगितले.

तरूणी घरात गेल्यानंतर प्राध्यपाकांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरूणीला खासगी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. तसेच, 'बॉयफ्रेंडशी ब्रेकअप कर'असं प्राध्यापकाने तरूणीला सांगितले. ग्रेड वाढवून देण्याचे प्रलोभन दाखवत त्यांनी तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. तसेच लैंगिक छळ केला. नंतर तरूणीला मैत्रिणीचा फोन आला. तेव्हा तिनं तिथून कसाबसा पळ काढला.

तरूणीनं धाडस करून टिळकनगर पोलीस ठाणे गाठले. तसेच प्राध्यपकाविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपी प्राध्यपकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, अटकेनंतर प्राध्यपकाला जामिनावर सोडण्यात आले. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group