धक्कादायक घटना : तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
धक्कादायक घटना : तिसरीत शिकणाऱ्या मुलाचा ३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
img
Dipali Ghadwaje
पुणे : पुण्यासह संपूर्ण राज्याला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तिसरीत शिकणाऱ्या मुलानं प्रीस्कूलमधील एका ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलीनं अत्याचाराची माहिती आईला दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.

मिळालेल्या माहितीनुसार , याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली. त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर केलं असता मुलाला जामीन मिळाला आहे. कोर्टाने मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात देण्याचे निर्देश दिले आहेत.

ही धक्कादायक घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. आरोपी मुलगा आणि पीडित मुलगी एकाच भागात राहातात. दोघंही एकमेकांचे शेजारी आहेत. दोघांचं कुटुंबही एकमेकांना ओळखतं. पीडित मुलगी आरोपीला दादा म्हणते. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी आरोपीच्या घराच्या परिसरात एकटी दिसली. या संधीचा फायदा घेऊन आरोपी मुलाने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

अत्याचाराच्या घटनेनंतर पीडित मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. मुलीसोबत घडलेला धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईनं कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

यानंतर पोलिसांनी पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या एनजीओच्या प्रतिनिधींनी मुलीला विश्वासात घेत, तिची चौकशी केली, यानंतर तिने सगळा घटनाक्रम सांगितला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group