धक्कादायक ! रीलची ऑफर देत १५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, यूट्यूबरला अटक
धक्कादायक ! रीलची ऑफर देत १५ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार, यूट्यूबरला अटक
img
वैष्णवी सांगळे
पश्चिम बंगालमध्ये ४८ वर्षाच्या यूट्यूबरने आणि त्याच्या मुलाने नववीत शिकणाऱ्या १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली. डान्स आणि कॉमेडी रील काढण्याचे आमिष दाखवत बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांनी बाप आणि मुलाला बेड्या ठोकल्यात. 


पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना जिल्ह्यात बलात्काराची ही संतापजनक घटना घडली. अरबिंदु अन् त्याच्या मुलाने काही दिवसापूर्वी नववीतील मुलीसोबत संपर्क साधला. शॉर्ट्स अन् रीलची तिला ऑफर दिली. शूटिंगसाठी मुलीला वेगवेगळ्या जागेवर दोघे घेऊन गेले. लपून लपून मुलीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्या व्हिडिओची धमकी देत मुलीवर बलात्कार केला.

बाप आणि मुलांनी नववीच्या मुलीला ब्लॅकमेल करत बलात्कार केला. व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी त्या मुलीला वारंवार दिली जात होती. धमकीला घाबरून मुलीने कुणाला काही सांगितले नाही. अरबिंदुच्या मुलाने मुलीला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी हरोआ पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत बाप आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलिसांनी ४८ वर्षाच्या यूट्यूबर अरबिंदु मोंडल याला अटक केली आहे. अरबिंदु मोंडल याचे यूट्यूबवर 4.3 मिलियन (43 लाख) फॉलोवर्स आहेत. पोलिसांनी अरबिंदु याला कोर्टात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अरबिंदु याच्या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आलेय.
इतर बातम्या
Join Whatsapp Group