‘IPL दरम्यान बलात्कार..’, 'या' क्रिकेटर विरोधात पीडितेची पोलिसांकडे धाव
‘IPL दरम्यान बलात्कार..’, 'या' क्रिकेटर विरोधात पीडितेची पोलिसांकडे धाव
img
वैष्णवी सांगळे
आयपीएलमधून प्रसिद्ध झालेला भारतीय क्रिकेटपटू यश दयाल एका मोठ्या वादात अडकला आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील गाझियावाद येथील एका तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते.  याप्रकरणी यश दयालवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र आता यश दयालच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यश दयालचा पाय आणखी खोलात जाऊ शकतो.

नुकत्याच समोर आलेल्या प्रकरणात आता जयपूरमधील सांगानेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यातचे आमिष दाखवण्यात आले. तसेच तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करण्यात आले आणि दोन वर्षे तिच्यावर बलात्कार करण्यात आला असा त्या मुलीचा आरोप आहे. 

दोन वर्षांपूर्व पीडित तरूणी ही अल्पवयीन होती, तेव्हाच जयपूरमध्ये तिची यश दयालशी ओळख झाली. आयपीएलची मॅच खेळण्यासाठी यश हा तेव्हा जयपूरला आला होता. तेव्हा क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल टिप्स देण्याच्या बहाण्याने यश दयलाने आपल्याला हॉटेलमध्ये बोलावले होते, असा दावा त्या तरूणीने केला. तसेच आयपीएल-2025 च्या सामन्यादरम्यान तिला सीतापूरमधील एका हॉटेलमध्ये बोलावून देखील तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

राज्यात अतिवृष्टी? काय आहे हवामान विभागाचा अंदाज ?

कोण आहे यश दयाल ? 
यश दयाल हाँ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या आयपीएल 2025 च्या विजेत्या संघाचा भाग होता आणि त्याने 5 सामन्यांमध्ये 13 विकेट्स घेतल्या. तो 2022 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा सदस्यही होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेश संघाकडून खेळतो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group