नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : प्रेमाच्या जाळ्यात युवतीला अडकवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर चार वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.याबाबत पीडितेने दिलेली अधिक माहिती अशी, की 32 वर्षीय पीडिता नाशिकमधील एका स्पा सेंटरमध्ये कामाला होती. त्या काळात आरोपी भीमसिंग कबीर नायक (रा. फांतासिया बिझनेस पार्क, वाशी, नवी मुंबई) हा स्पा सेंटरला नियमित जायचा. त्याच्याशी तिची सन 2021 मध्ये ओळख झाली.
हे ही वाचा !
त्याने नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे खोटे आमिष दाखविले. 22 जुलै 2021 ते 21 जून 2025 या काळात आरोपी नायकने फिर्यादीवर नाशिक, नाशिकरोड व तिच्या घरी वेळोवेळी अत्याचार केले. दरम्यानच्या काळात ती गर्भवती राहिली. त्यावेळी त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. गर्भवती राहिल्याने तिने त्याच्याकडे लग्नासाठी वेळोवेळी गळ घातली. त्यावेळी त्याने पीडित महिलेला जातिवाचक शिवीगाळ करून मारझोड केली.
लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजल्याने तिने भीमसिंग नायकविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी करीत आहेत.