भयानक कारनाम्यांनी सगळ्यांनाच चक्रावून सोडणारा अशोक खरात सध्या तुरुंगात आहे, त्याची चौकशी सुरु आहे. अशोक खरातमुळे सामाजिक वर्तुळासह राजकीय वर्तुळात देखील एकच खळबळ उडालेली आहे. दरम्यान चौथ्या गुन्हात आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर करणार आहे. याप्रकरणी आता अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वतीबाई शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
सासू नेमकं काय म्हणाल्या ?
“मला काहीच कोणी सांगत नाही आणि मी विचारतही नाही. मला खूप वाटतं, का म्हणून त्यांना कोंडलं? माझ्या खानदानात कधी असं झालं नाही. ही घटना का आणि कशी घडली मला माहित नाही आणि ज्यांना माहीत आहे ते काही सांगतात का?र डावं का गुपचूप बसावं? माझी मुलगी तर एकदम साधी, ती कधी कोणाला काही बोलली नाही, काही केलं नाही. पण तिच्या काय कर्माला आलं? कधी सुटते काय माहित? ती कुठे आहे काहीच माहीत नाही. वाटतं लवकर यावं पण येतील का? जावई नाही आले तरी चालेल पण माझी मुलगी आली पाहिजे,” असं त्या म्हणाल्या.
महिला लैंगिक शोषणप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या खरातविरोधात नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत 13 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यातील नऊ गुन्ह्यांचा तपास एसआयटी तर उर्वरित गुन्ह्यांचा तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
अंजली दमानिया मोठा गौफ्यस्फोट करणार
दरम्यान, अशोक खरातच्या दरबारात बडे राजकारणीच नाही तर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांनही हजेरी लावल्याचे म्हटले जात आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. तर काही जणांना खरातने फोन केला आहे. या सर्वांची कुंडलीच अंजली दमानिया उद्या सर्वांसमोर आणणार आहेत. खरातला कॉल करणाऱ्यांची यादीच त्या जाहीर करण्याची शक्यता आहे. राजकारण्यांची नावं ऐकूण धक्का बसेल असा दावा त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. त्यात पोलीस निरीक्षक, तहसीलदारापासून ते अनेक अधिकारी आहेत. अशोक खरात याने यंत्रणेचा वापर केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हा वापर केला आहे. राजकारण्यांना सुद्धा मोठा फायदा मिळवून दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. याविषयीचा मोठा खुलासा दमानिया उद्या पत्रकार परिषदेत करणार आहेत.