मोठी बातमी: अशोक खरातला 'इतक्या' दिवसांची न्यायालयीन कोठडी
मोठी बातमी: अशोक खरातला 'इतक्या' दिवसांची न्यायालयीन कोठडी
img
वैष्णवी सांगळे
अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली. अशोक खरातविरोधात नवनव्या तक्रारी दाखल होत आहेत. अशोक खरातने केलेलं लैंगिक शोषण, अनेकांना घातलेला आर्थिक गंडा आणि इतर अनेक कारनाम्यांची जंत्री वाढतच चालली आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती. 



दरम्यान, अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज (1 एप्रिल) नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर केलं होतं. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी अशोक खरातला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले आहे. तेथे त्याची सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता त्याची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली जाणार आहे.

अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी अशोक खरातचा मुक्काम कारागृहात जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. शिर्डी येथील फसवणुकीच्या दुसऱ्या एका गुन्ह्यात अशोक खरात आणि त्याची पत्नी दोघेही आरोपी आहेत. या दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस त्याला उद्या पुन्हा अटक दाखवून न्यायालयासमोर हजर करणार आहेत. त्यामुळे उद्या पुन्हा त्याला पोलीस कोठडी मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही देखील या गुन्ह्यांमध्ये तितकीच सहभागी असल्याचे समोर आले आहे. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच ती फरार झाली असून पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group