भोंदू अशोक खरातची भविष्यवाणी ऐकताच बच्चू कडुंनी थेट पाय धरले;  व्हिडिओ व्हायरल
भोंदू अशोक खरातची भविष्यवाणी ऐकताच बच्चू कडुंनी थेट पाय धरले; व्हिडिओ व्हायरल
img
वैष्णवी सांगळे

नाशिकचा भामटा अशोक खरात याची काळी कृत्य आता समोर आली आहेत. आतापर्यंत खरातवर ६ गुन्हे दाखल झाले आहेत. ज्या महिला आणि पुरुष अशोक खरातच्या भोंदू पणाला बळी पडले आहेत त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, तक्रारदारांचे नाव हे गुप्त राहील असे नाशिक पोलिसांनि सांगितले आहे. अशोक खरातने फक्त महिलांचेच शोषणच केले नाही तर तर अनेकांच्या जमिनी हडपल्या तर अनेकांची आर्थिक लूट देखील केली आहे. खरात अनेक राजकीय नेत्यांशी संबंध होते त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. 



या भोंदूचे अनेक राजकीय भक्त एकामागून एक समोर येत आहेत. केंद्रीय मंत्र्यापासून ते गल्लीबोळातील नेत्यांपर्यंत अनेक जणांनी त्याच्या आश्रमात हजेरी लावली आहे. अनेकांनी त्याची पाद्यपूजा केली आहे. तर काहींनी त्याच्यासमोर लोटांगण घातले आहे. या यादीत आता प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांचे नावही समाविष्ट झाले आहे. 

भोंदू बाबा अशोक खरात सोबतचा बच्चू कडू यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांमधील संवाद समोर आला आहे. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरचा हा व्हिडिओ असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॅप्टन अशोक खरात : I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेंव्हा तुम्ही BJP मध्ये मंत्री असाल तेंव्हा तुम्ही इथे या!

बच्चू कडू : (पाया पडत) ठीक आहे.

२०२२ च्या महाविकास आघाडी सरकारच्या बंडखोरीत बच्चू कडू शिंदें गटासोबत गुवाहाटीला गेले होते, तरीही त्यांना नवीन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. २०२२ मध्ये उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी शिंदे गटासोबत जे आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यात बच्चू कडू यांचा समावेश होता.बंडानंतर शिंदे सरकार स्थापन झाले, परंतु बच्चू कडूंना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. खरात याच्या भेटीचा बच्चू कडू यांचा दोन वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे.

अशोक खरात याच्यासोबतच्या त्या व्हिडिओवबाबत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फोटो तर अनेकांचे अनेकांसोबत आहेत. तसं झालं तर मग मुख्यमंत्र्यांसह सर्वच पळ काढतील.मोदींचा पण फोटो भोंदूबाबासोबत आहे. आपले तर अर्धे राजकारणी बाबा, देवाशिवाय आणि मंदिराशिवाय, धर्माशिवाय यांना काही जमते का हो? त्यांना तर तिथंच पळावं लागतं. मी जर काढत बसलो तर प्रत्येक भागातील भोंदूबाबासोबत त्यांचे त्यांचे फोटो आहेत.फोटोवरून तर्क लावू नये. जर एखाद्यानं नेलं. कार्यकर्त्यानं नेलं आणि तिकडं त्या बाबानं काही केलं. तर आम्ही दोषी आहोत का? भोंदूबाबाची ही जी जमात वाढत आहे, त्याला कारणीभूत आपणच आहोत. लोकही तेवढेच कारणीभूत आहेत अशी टीका बच्चू कडू यांनी केली.


इतर बातम्या
Join Whatsapp Group