अशोक खरातचा एसआयटीच्या तपासात अजब दावा, काय तर म्हणे, महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग
अशोक खरातचा एसआयटीच्या तपासात अजब दावा, काय तर म्हणे, महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग
img
वैष्णवी सांगळे
अध्यात्म आणि भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरात हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहेत. अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी एसआयटीकडून तपास सुरु आहे.दरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. 



अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला. माझ्या अंतर्मनाने मला धोका दिला. मी यांचे भले केले तेच माझ्यावर उलटले, असं अशोक खरात तपासात म्हणाला. मी कुणावरही जबरदस्ती केलेली नाही, तसेच महिलांसोबत केलेली कृती हा विधीचाच एक भाग असल्याचा खळबळजनक दावा अशोक खरातने केला आहे. यापुढे मी फक्त माझ्या मेंदूचेच ऐकणार, असंही अशोक खरात चौकशीदरम्यान म्हणाला. अशोक खरातचा पोलीस कोठडीत देखील मंत्रजप सुरु असल्याची माहिती आहे. 

दरम्यान तपासात अनेक बाबाजी समोर येत आहे. अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली आहे, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group