गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे. इतकंच काय तर सुनीता अहुजानं घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केलाय इथपर्यंत ही चर्चा पोहोचलीय. गोविंदा आणि सुनीताच्या घरीही लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. यावेळी लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी दोघेही उपस्थित होते. माध्यमांनी त्यांना घटस्फोटाच्या चर्चांवर विचारणा केली असता सुनीता अहुजा प्रमाणे गोविंदानेही हे वृत्त फेटाळून लावले आहे.
हे ही वाचा
यापूर्वी गोविंदाच्या मॅनेजरने घटस्फोटाची वृत्त फेटाळून लावलं होतं. शिवाय गोविंदा आणि सुनीता आहुजा एकत्रपणे गणेशोत्सव साजरा करताना दिसतील, असंही मॅनेजरने म्हटलं होतं. दरम्यान, बुधवारी मॅनेजरचे शब्द खरे ठरले. यावेळी दोघांनीही घटस्फोटांच्या चर्चेबाबत उघडपणे भाष्य केलं.
हे ही वाचा
अभिनेता गोविंदा म्हणाला, माझी लायकी नसताना मला भरपूर काही मिळालं आहे. आईचा (देवी) आशीर्वाद मला मिळाला. मातृ देवो भव.. तुम्ही कधीही मला कोणत्या स्त्रीचा विरोध करताना पाहाणार नाहीत. घरात आणि परिवारात देखील मी कायम प्रार्थना करतो. तुम्हाला किती मोठी स्टारडम मिळाली. तर ईश्वराने पुरुषाकडे कर्म दिलं आहे. परंंतु भाग्य जे आहे, त्याची देवी नेहमी स्त्री आहे, असं गोविंदाने स्पष्ट केलं आहे.