टीव्ही विश्वातील एका लोकप्रिय जोडप्याच्या घटस्फोटाचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे आणि ही जोडी म्हणजे माही विज आणि जय भानुशाली. २०११ साली या जोडप्याने लग्न केले होते, १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील पॉवरफुल कपल जय भानुशाली आणि माही वीज यांनी घटस्फोट घेतला. २०११ मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने १४ वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया जुलै- ऑगस्ट २०२५ मध्ये पूर्ण झाली आहे.
असे सांगितले जात आहे की, जय भानुशाली आणि माही वीज यांच्यात बऱ्याच काळापासून सगळं काही ठीक नव्हतं. त्यांच्यामध्ये सतत मतभेद होत होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच न्यायालयात धाव घेत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. ते अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते.
त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही या वर्षी जुलैमध्ये समोर आल्या होत्या. दोघांनी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही केली. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाचे वृत्त समोर आले. अहवालानुसार, जय आणि माही जुलै-ऑगस्ट महिन्याआधीच वेगेळे झाले होते.