नाशिकच्या 'या' शाळेला आला बॉम्ब असल्याचा मेल अन नंतर समजले असे....
नाशिकच्या 'या' शाळेला आला बॉम्ब असल्याचा मेल अन नंतर समजले असे....
img
वैष्णवी सांगळे
नाशिकमध्ये एका शाळेतून खळबळजनक घटना समोर आली आहे. आज (दि. १५) साधारण दुपारी १.४५ वाजेच्या सुमारास केम्ब्रिज शाळेला एक ईमेल प्राप्त झाला.

या मेलनुसार शाळेच्या शौचालय तसेच आवारात तीन बॉम्ब ठेवले असून लवकरात लवकर शाळेमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढावे असा मजकूर होता. या मेल मुळे एकच खळबळ उडाली होती. 

अभिमानास्पद ! नाशिकची दिव्या महाजन ठरली अमेरिकेतील कॅटलिना चॅनल पार करणारी सर्वात तरुण भारतीय स्विमर

हा मेल प्राप्त झाल्यानंतर त्वरित इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे शाळेमार्फत तक्रार देण्यात आली. त्यानंतर इंदिरानगर पोलीस स्टेशनने बाँब शोध पथकाला पाचारण केले. दरम्यान सुरक्षा उपाययोजना म्हणून पालकांना सुचित करून विद्यार्थ्यांना शाळेतून घरी पाठवण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध पथकाने शाळेची पूर्ण तपासणी केली व त्यांना आक्षेपार्ह असे काहीच आढळून आले नाही असे शाळे तर्फे कळविण्यात आले आहे.

मिळालेल्या मजकूर प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन कडून अधिक तपास सुरु आहे. या मेल मुळे मात्र शाळेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group