कोल्हापूर : कोल्हापूर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निकालानंतर भाजपला गळती लागली असून अनेक नेत्यांचे विधानसभेच्या तोंडावर राजीनामासत्र सुरू झाले आहे. कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकीय हादरे बसणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे.राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहे.
समरजीत घाटगे हे तुतारी घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर असताना राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे.
राहुल देसाई यांचा राधानगरी- बुदरगड विधासभा मतदारसंघ हा कार्यक्षेत्र आहे. याच विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली होती. त्याच मागणीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडील देखील काँग्रसचे माजी आमदार होते. विधानसभेसाठी तिकिट मिळेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता झालेल्या उलथापलथीनंतर त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.