धक्कादायक घटना  :
धक्कादायक घटना : ".....म्हणून , रागातून मामानेच भाचीच्या लग्नाच्या जेवणात मिसळलं विष" ;नेमकं काय प्रकरण?
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाचीच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानेच विष मिसळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , आचाऱ्याच्या समोरच मामाने हे कृत्य केल्याने आचाऱ्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यात झटापटही झाली. आचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ते अन्न कोणीच खाल्ल नाही आणि मोठा अनर्थ टळला. मेहश पाटील असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मामा महेश सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं ?

कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील ही घटना आहे. महेश ज्योतिराम पाटील यांची भाच्ची आठवड्याभरापूर्वी त्याच गावातील एका मुलासोबत पळून गेली होती आणि त्या दोघांनी लग्न केलं. आपल्या भाच्चीने आपल्या मनाविरोधात लग्न केलं, तसंच ती पळून गेल्याने बदनामी झाली, याचा राग तिचा मामा महेश याच्या डोक्यात होता.

ती तरूणी आणि तरूणाच्या लग्नानंतर अखेर कुटुंबियांनी त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्या लग्नाचा स्वागत सोहळा समारंभ ( रिसेप्शन) आयोजित करण्यात आलं होतं.

मात्र महेश यांच्या डोक्यात राग कायम होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने हे भयानक पाऊल उचललं. रिसेप्शनला येणाऱ्या लोकांसाठी जेवण बनवण्यात येत होतं, तेवहा आरोपी महेश तिथे पोहोचला आणि त्याने त्या जेवणाच्या भांड्यामध्ये विषारी औषध टाकण्याचा प्रयत्न केला, तेथील लोकांच्या जीवास धोका पोहोचवण्याचा त्याचा प्रयत्न होता, मात्र जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याने हा प्रकार पाहिला आणि त्याने जेवणात विषारी औषध टाकणारा मुलीचा मामा महेश याला रोखलं, त्या दोघांची झटापटही झाली.

अखेर त्या आचाऱ्याच्या सतर्कतेमुळे ते अन्न कोणी खाल्लं नाही आणि मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी आरोपी महेश पाटील विरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group