मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मतदान करण्यास गेलेल्या वयोवृद्ध मतदाराचा रांगेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
img
Dipali Ghadwaje
कोल्हापूर : लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून मतदान केंद्राबाहेर चांगली गर्दी पाहायला मिळत आहे. 

दरम्यान उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले महादेव श्रीपती सुतार (वय ६९, रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) हे रांगेतच चक्कर येऊन कोसळले. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली

अधिक माहिती अशी की, कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेत मतदान करण्यासाठी उत्तरेश्वर पेठ येथे राहणारे महादेव श्रीपती सुतार हे सकाळी १० च्या सुमारास मतदान केंद्रावर पोहोचले. दरम्यान ते रांगेत उभे असतानाच अचानक चक्कर आल्याने जागेवरच कोसळले. या घटनेमुळे मतदान केंद्राच्या परिसरात काही काळ कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. नातेवाईकांसह राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group