जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू!  कोण आहे 'जलेबी बाबा'....
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! कोण आहे 'जलेबी बाबा'....
img
Dipali Ghadwaje
हरयाणातील बालकनाथ मंदिराचा तत्कालीन पुजारी अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याची मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडली. कैद असलेल्या जलेबी बाबाला पोलिसांनी जवळच्या इस्पितळात नेले. तिथून त्याला जवळील अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

जलेबी बाबा महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १४ वर्षांची शिक्षा भोगत होता. हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या टोहाना येथील रहिवासी असलेल्या जलेबी बाबाने महिलांचा लैंगिक छळ केला होता. याच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

तेव्हा टोहानाच्या नागरिकांनी या बाबाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी १९ जुलै २०१८ जलेबी बाबावर बलात्कार आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मग पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या माहितीवरून त्याच्या घरातून १०० हून अधिक व्हिडीओ जप्त केल्या. 

यामध्ये तो वेगवेगळ्या महिलांसोबत संबंध ठेवताना दिसत होता. बलात्काराचा व्हिडीओ बनवल्याप्रकरणी फतेहाबाद न्यायालयाने त्याला १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान शिक्षा भोगत असतानाच जलेबी बाबाचा मृत्यू झाला. चहामध्ये अंमली पदार्थ मिसळून जवळपास १२० महिलांना ती प्यायला देऊन त्यांच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप जलेबी बाबावर करण्यात आला होता. त्यानंतर २०२३ मध्ये फतेहाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश बलवंत सिंह यांनी ५ जानेवारी २०२३ रोजी जलेबी बाबाला दोषी घोषित केले. 

२०१८ मध्ये टोहाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनंतर, जलेबी बाबावर पॉक्सो कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group