पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि ओडिशानंतर आता कर्नाटकात भाजप नेत्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील गंगावतीतून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष वेंकटेशन कुरुबारा यांची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. जुन्या वैमनस्यातून वेंकटेशन यांची हत्या झाल्याचं उघड झालं आहे. भाजप नेत्यांच्या हत्यांच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नेत्याच्या हत्येची घटना कर्नाटकातील गंगावतीमध्ये घडली. भाजप नेते लीलावती एलुबू किलू रुग्णालयाजवळ एका कामानिमित्त उभे होते. त्याचवेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. बेदम मारहाण केली. लाठ्याकाठ्यांनी हल्ला करण्यात आला. या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वेंकटेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.