पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बबन घोलप यांच्या विषयी दोन दिवसात निर्णय घेणार - संजय राऊत
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बबन घोलप यांच्या विषयी दोन दिवसात निर्णय घेणार - संजय राऊत
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी):-  शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमची कैफियत जाणून घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर कथन करणार आहे. त्यानंतर शिर्डी संपर्क प्रमुखाच्या बाबतीचा निर्णय घेणार असल्याचे राज्याचे माजी मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी सांगितले.

माजी मंत्री बबन घोलप यांना शिर्डी संपर्कप्रमुख पदावरून काही कराण नसतांना काढून टाकले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौरा बाबत कोणतीही कल्पना दिली नाही. घोलप संपर्कप्रमुख असतांना त्यांनी निवड केलेल्या जिल्हाप्रमुख,पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही.

उलट नुकताच माजी खासदार वाघचौरे यांना पक्ष प्रवेश देत शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे घोलप यांना डावलून वाघचौरे यांना "प्रमोट" करण्याचे काम करीत असल्याचे निदर्शनास आल्याने घोलप यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देत नार्वेकर यांच्या वर गंभीर आरोप केले. माध्यमा मधून या बातम्या झळकल्याने शिर्डी सह नाशिक शहरात खळबळ उडाली.

या प्रकरणी  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी बबन घोलप हे कडवट शिवसैनिक असल्याचे सांगत घोलप यांना भेटी साठी पाचारण केले. सोमवारी सकाळी बबन घोलप
जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,भारत मोरे व सदिप आयनोर यांनी खा. राऊत यांची भेट घेत आपली कैफियत मांडली.

यावर खा राऊत म्हणाले की, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून ही भेट झाली असून घोलप यांनी जी कैफियत मांडली ती सर्व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असून दोन दिवसांत शिर्डी संपर्क पदाचा विषय मिटेल आणि सर्व सुरळीत होईल असे सांगितले.

यावर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सकारात्मक व पक्ष हिताच्या दृष्टीने निर्णय घेतील अशी आशा असल्याचे घोलप यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group