जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान ; वाचा काय म्हणाले...
जागा वाटपावरुन संजय राऊत यांचं मोठं विधान ; वाचा काय म्हणाले...
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच सर्वत्र राजकीय घडामोडी वेगाने सुरु झाल्या आहेत. अशातच  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी नियमित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. मविआच जागा वाटप कुठे रखडतय ते सांगितलं.

“आता सकाळी माझी महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुकूल वासनिक यांच्याशी बोलणं झालं. आज राहुल गांधींशी बोलणार आहे. सीट शेयरिंग बद्दल थांबलेल्या गोष्टींना गती मिळावी यासाठी चर्चा करणार आहे” असं संजय राऊत म्हणाले. “बऱ्याच जागांवर निर्णय झालाय. काही जागांवर निर्णय होत नाहीय. आता वेळ कमी आहे.

महाराष्ट्राचे नेते निर्णय घेण्यात सक्षम नाहीत असं मला वाटतं. ते वारंवार दिल्लीत यादी पाठवतात. मग, चर्चा होते. आता वेळ निघून गेलीय. लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेत मतभेद नाहीयत. काँग्रेस बरोबर सुद्धा तसे मतभेद नाहीयत. पण काही जागांवर तिन्ही पक्ष दावा करत आहेत. काँग्रेस हायकमांडसोबत आम्ही चर्चा केली. बैठकीत जी चर्चा झाली, त्या बद्दल उद्धव ठाकरेंना सांगितलं. 200 पेक्षा जास्त जागांवर सहमती झालीय. पण काही जागांवर तिढा, पेच आहे. उद्धव ठाकरेंनी काही सूचना केल्यात, त्याचं पालन करीन” असं संजय राऊत म्हणाले.
 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group