"आता माझा शब्द अंतिम असणार , त्याचे भान मला ठेवावे लागते" नेमकं काय म्हणाले अजित पवार.....
img
Dipali Ghadwaje
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एका मराठी वृत्त वाहिनीला शुक्रवारी मुलाखत दिली. दरम्यान अजित पवार यांनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळे उत्तरे दिली. 

यावेळी अजित पवार यांच्यात बदल झाला आहे. पूर्वी असणारे अजित पवार आणि आता असणारे अजित पवार वेगळे आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, पूर्वी शरद पवार पक्षाचे सर्वोच्च नेते होते. त्यांच्या शब्द अंतिम होता.

त्यावेळी मी दुसऱ्या फळीत होतो. परंतु आता पक्षाचा प्रमुख मी झालो आहे. त्यामुळे माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. माझा शब्द अंतिम असणार आहे. त्यावर माझे कार्यकर्ते, माझ्या सोबत असणाऱ्या लोकांचे भविष्य अवलंबून आहे. त्याचे भान मला ठेवावे लागते, असे अजित पवार यांनी म्हटले.

पवार साहेब म्हणतात, बारामतीमधील लोकांना मी ओळखतो. मी देईल, तो उमेदवार निवडून येतो. त्यावर अजित पवार म्हणाले, तो पवार साहेबांचा अधिकार आहे. परंतु सर्वात मोठा अधिकार जनतेचा आहे. 

पाच वर्षांपूर्वी ज्याला मताधिक्य मिळाले होते, तो त्यानंतर पाच वर्षांत पराभूत होतो. अगदी १९९९ मध्ये पाहा, लोकसभा आणि विधानसभा एकत्र निवडणूक झाल्या होत्या. महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांना मतदान केले. विधानसभेत आघाडी सरकारला मतदान दिले.

पवार साहेब म्हणाले होते ३० वर्षे अजित पवार यांना संधी दिली, आता नव्या नेतृत्वाला संधी द्या. शरद पवार यांच्या या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांनी ३० वर्ष विधानसभेत आणि ३० वर्षे लोकसभेत काम केले आहे. म्हणजे ६० वर्षे काम त्यांनी केले आहे. माझे तर काम अजून ३० वर्षच झाले आहे. पवार साहेब ३० वर्षांच्या राजकारणात निवृत्त झाले का? नाही ना. मग मी आता काय करायचे…कारण लोकसभेसाठी बारामतीत शिल्लक नाही.

त्यामुळे मी विधानसभा लढणार आहे. पवार साहेब यांच्या निवृत्तीच्या संकेताबाबत अजित पवार म्हणाले की, यापूर्वी शरद पवार यांनी निवृत्तीचे संकेत दिले होते. परंतु त्यानंतर त्यांनी तो निर्णय मागे घेतला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group