अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार ? भाजपच्या ''या'' नेत्याने केलं स्पष्ट, म्हणाले
अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढणार ? भाजपच्या ''या'' नेत्याने केलं स्पष्ट, म्हणाले
img
दैनिक भ्रमर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात सध्या एक चर्चा रंगलीय.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी शिवेसना-भाजपकडून छुपे प्रयत्न केले जात असल्याचं म्हटलं जातंय. अजित पवार यांची कोंडी करायची आणि ते महायुतीतून बाहेर पडल्यास शिवसेना-भाजपला जास्त जागा मिळतील असं नेत्यांना वाटत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान , यावर भाजपच्या एका नेत्याने सप्ष्टीकरण दिले आहे . 

भाजपकडून हे वृत्त फेटाळून लावण्यात आलं असून भाजप नेते आशिष शेलार यांनी ही बातमी कपोलकल्पित असल्याचं म्हटलंय. मविआकडून खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

भाजप शिंदे सेना आणि अजितदादांचा सामना करण्याची ताकद मविआ हरवून बसली आहे. खोट्या बातम्यांचं राजकीय षडयंत्र रचलं जात आहे. जेव्हा उद्धव ठाकरे दिल्लीहून आले आणि मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका घेतली तेव्हाच काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीने वेळ पडली तर ठाकरे सेनेला सोडून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group