आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रवादी कुणाची व घड्याळ चिन्ह कुणाचे याबाबत गेल्या वर्षभरापासून वेगवेगळे तर्क लावले जात होते. दोन्ही गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या बातमीमुळे शरद पवार गटाला चांगलाच धक्का बसला आहे.
अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज सर्वोच्च न्यायलयाने फेटाळली. त्यामुळे अजित पवार गटाकडे घड्याळ चिन्ह कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. अजित पवार गटाने घड्याळ या चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे अजित पवार गटाला या चिन्हावरच निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यानंतर पक्ष व चिन्ह कुणाचे यावर वाद झाला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार गटाला दिलेल्या घड्याळ चिन्हावर आक्षेप घेत त्यांना दुसरे चिन्ह देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयात शरद पवार यांच्या पक्षातर्फे दाखल याचिका फेटाळण्यात आली. यामुळे अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घड्याळा ऐवजी दुसरा चिन्ह देण्याची मागणी शरद पवार यांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र याचिका फेटाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
अजित पवार यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात शरद पवार गटाच्या मागणीला जोरदार विरोध केला. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आमच्या काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार असल्याचे आदेश दिले.