"आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, हे आमचं मुख्य उद्धिष्ट" ; शरद पवार नेमकं काय म्हणाले....
img
Dipali Ghadwaje
शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. जशी लोकसभा लढलो तशी विधानसभा लढायची आणि राज्य हातात घ्यायचे, असे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकींची तुतारी फुंकली आहे. आज शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या जुन्नर, आंबेगाव भागाचा दौरा केला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान या सरकारने ठराविक लोकांसाठी सत्ता वापरण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने 48 पैकी 31 खासदार निवडून दिलेत. याचा अर्थ जनतेचा कल बदलेला आहे. आता जनतेने आमच्याकडे अपेक्षा ठेवल्या आहेत," असे महत्वाचे विधान शरद पवार यांनी केलं. 

शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढविणार आहे. मविआ चे तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. हीच जागा द्या किंवा तीच जागा द्या, असा आग्रह आम्ही करणार नाही. आम्हाला राज्याला स्थिर सरकार द्यायचं आहे, हे आमचं मुख्य उद्धिष्ट आहे. आता राज्य हातात घ्यायचे आहे, असंही शरद पवार म्हणाले.

वळसे पाटलांवर निशाणा
"दिलीप वळसेंनी त्यांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले नाहीत का? हे त्यांना विचारा. मुळात ते किती वर्षे सत्तेत आहेत. 35 वर्षे आमदार, त्यापैकी २५ वर्षे मंत्री आहेत. आता ज्यांना 25 वर्षात विकास करता आला नाही ते आता काहीतरी सांगतात. मुळात हा संधीसाधूपणा आहे. अनेकांना अनेक वर्षे संधी देऊन ही त्यांना कामं करता आलेली नाहीत. जनतेला न्याय देता आलेलं नाही, याला उत्तर आता शोधावं लागेल. यासाठी राज्याची सत्ता हातात घ्यावी लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी थेट दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला.
इतर बातम्या
Join Whatsapp Group