लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकिल योगेश उदगीरकर यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे.
योगेश उदगीरकर काय काय म्हणाले?
लोकसभेचा निकाल लागून आज 46 वा दिवस आहे. 45 दिवसांची हायकोर्टाची इलेक्शन पीटीशन दाखल करण्याची मुदत होती, ती काल संपलेली आहे. लातूरचे निवडून आलेले उमेदवार काळगे यांच्याविरोधात आम्ही पर्वा रीट पीटीशन दाखल केली आहे. आपण त्यांच्याविरोधात दोन केसेस दाखल केलेल्या आहेत. आपण त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला चॅलेंज केलेलं आहे. दुसरं म्हणजे इलेक्शन पीटीशनही आपण दाखल केलेली आहे, असं योगेश उदगीरकर म्हणाले.
शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं
पुढे बोलताना योगेश उदगीरकर यांनी सांगितले की, शिवाजी काळगे यांनी 1986 साली जात प्रमाणपत्र काढलं होतं, ते औरंगाबादच्या आयुक्तांनी रद्द केलं. त्यांनी त्याठिकाणी सांगितलं की दिनांकमोठी बातमी : या नेत्याची खासदारकी धोक्यात? काय आहे नेमकं प्रकरण वाचा
5 डिसेंबर 1985 अन्वये संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी. म्हणजेच ज्यांनी त्यांचं जात प्रमाण काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, असं आयुक्तांनी म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र शासनानेही त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं.