मोठी बातमी : वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश ;  शिवबंधन बांधताच ठाकरेंना दिला
मोठी बातमी : वसंत मोरेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश ; शिवबंधन बांधताच ठाकरेंना दिला
img
DB

वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा निवडणूक लढलेले वसंत मोरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला पुणे शहरात बळ मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

वसंत मोरेंनी वंचित बहुजन आघाडीला निरोप देत, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान वसंत मोरेंची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती. आणि आता शेवट पुन्हा शिवसेनेतच झाला आहे. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.

वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशावेळी संजय राऊत, उद्धव ठाकरे तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला.

यावेळी संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं.म्हणाले, शिवसेनेत पुन्हा वसंत फुलला आहे, पुणे ,खडकवासला वसंत मोरेंच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

 25 नगरसेवक निवडून आणणार 

बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन वसंत मोरेनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 1992 मध्ये शिवसेनेत सामील झालो. वयाच्या 31व्या वर्षापर्यंत विभाग प्रमुख झालो. नंतर मनसेत गेलो. आता शिवसेनेत आलोय. पुणे शहरात भविष्यात किमान 25 नगरसेवक निवडून आणणार असा शब्द वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंना दिला. मनसे पदाधिकारी माझ्या सोबत आल्याचे वसंत मोरे म्हणाले. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group