नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीचा पोस्टल मतदानाचा निकाल हाती येत असून कोणाचं पारडं जड राहणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. सगळ्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वपूर्व निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून विशेष काळजी घेतली आहे. उमेदवार निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू, असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले असून. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच काळजी घेतली जात आहे.
नाशिकच्या ओझर येथे खासगी विमानं तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. महाविकास आघाडीच्या या खेळीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निकाल जाहीर होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती. दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.