राज्यात मविआला बंडखोरांचा ताप , उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
राज्यात मविआला बंडखोरांचा ताप , उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
img
Dipali Ghadwaje
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर वीस नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाकरेंनी नेत्यांना सांगितले होते. पण अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. 

त्यामुळे ठाकरेंनी कठोर कारवाई करत पाच जणांना पक्षातून निलंबित केलेय. तिकीट नाकारल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरोधात उतरलेल्या बंडखोरांवर ठाकरेंनी मोठी कारवाई केली आहे. अखेरच्या दिवशीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे ठाकरेंनी कारवाई केली.

भिवंडी पूर्वचे रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय अवारी आणि प्रसाद ठाकरे यांच्यावर निलंबनाची करवाई करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बंडखोरीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १४ मतदारसंघात बंडखोर नेते विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षातील नेते मैदानात उतरलेत. ठाकरेंनी बंडखोरी मागे घेण्यास आपल्या नेत्यांना सांगितले. पण बंडोबा आपल्या निर्णायावर कायम राहिले, त्यामुळे ठाकरेंनी निलंबनाची कारवाई केली. उद्धव ठाकरेंनी पाच जणांना निलंबित केले.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group