जळगाव : राज्यात सर्वत्र मतदानाची लगबग सुरु आहे तर अशातच जळगावमधून एक मोठी बातमी समोर अली आहे. स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत आज मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता पहाटे शेगावकडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू झाली. या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे
याबाबत मिळविलेल्या माहितीनुसार , धारधार शस्त्रांनी त्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले असून याचवेळी प्रशांत डिक्कर यांना हृदविकाराचा तीव्र झटका येऊन ते अद्यापही बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला राजकिय विरोधक गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी डिक्कर यांच्यासाठी ३ सभा १ रॅली घेतली होती.
त्यावेळी उमेदवारासह संभाजीराजेंनी देखील याभागातिल दहशती विषयी चिंता व्यक्त केली होती. आज मतदानादिवशी हा हल्ला झाल्याने सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवार प्रशांत डिक्कर यांना निवडणूक प्रक्रिया राबवण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. या हेतुने हा हल्ला झाला असल्याच बोललं जात आहे.