"कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची" ; नेमकं काय म्हणाले शरद पवार?
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा जो आरोप करतात, त्याला काय आधार आहे. कोणीतरी काहीतरी मुर्खासारखं बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी त्यांनी त्यांच्यावर करण्यात येत असलेल्या जातीयवादाच्या आरोपांना सविस्तरपणे प्रत्युत्तर दिले.

माझ्या नेतृत्त्वाखाली पक्ष चालत होता, सरकारही चालत होते. तेव्हा आम्ही कोणाकोणाला प्रोत्साहन दिले. त्यावेळेस आमच्या पक्षात विधिमंडळात नेतृत्व निवड करायची होती. तेव्हा आम्ही मधुकर पिचड, छगन भुजबळ यांना नेता बनवलं. विविध जातीच्या लोकांना आदिवासी, दलित, ओबीसींना संधी दिली. आमचा दृष्टीकोन नेहमी व्यापक होता आणि आहे.

राज ठाकरे  काय बोलतात, त्याला काय आधार आहे, मला माहिती नाही. ते काहीही स्टेटमेंट ठोकून देतात. दहावेळा एखादी गोष्ट बोलली तर लोकांना काहीतरी असेल बुवा असे वाटते. तोच त्यांचा हेतू असावा, अशा शब्दांत शरद पवार यांनी राज ठाकरेंना फटकारले. 

 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group