मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झालेली असून, महायुती आणि महाविकास आघडीत जागा वाटपांची चर्चा अद्याप सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपांचा तिढा सुरू असतानाच इकडे प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीने 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यात 11 उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर आज (दि.9) वंचितकडून आणखी 10 जणांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यात पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचाही समावेश आहे. जाहीर करण्यात आलेल्या आजच्या यादीत मुस्लिम समाजातील इच्छूकांना संधी देण्यात आली आहे.
दुसऱ्या यादीत कुणा-कुणाला मिळाली संधी
- मलकापूर - शहजादे खान सलीम खान
- बाळापूर – खतीब सैय्यद नातीकोद्दीन
- परभणी – सय्यद समी सय्यद साहेबजान
- औरंगाबाद मध्य – मो. जावेद मो.इसाक
- गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर
- कल्याण पश्चिम – अयाज गुलजार मोलवी
- हडपसर – अॅड. मोहम्मद उपरोज मुल्ला
- माण – इम्तियाज जाफर नदाफ
- शिरोळ – आरिफ मोहम्मद अली पटेल
- सांगली - आल्लाउद्दीन हयातचाँद काजी