मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे त्या आधीच शिंदे सरकारने राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली आहे.
यात नाशिक विभागाचे अप्पर विभागीय आयुक्त निलेश सागर. नाशिक जात पडताळणी समितीचे अध्यक्ष अर्जुन चिखले याना केंद्र शासनाने IAS पदावर बढती दिली आहे .
राज्यसेवेतील कोणत्या अधिकाऱ्यांना IAS पदी बढती?
1. संजय ज्ञानदेव पवार
2. नंदकुमार चैतराम भेडसे
3. सुनील बजाजीराव महिंद्रकर
4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
5. निलेश गोरख सागर
6. लक्ष्मण भिका राऊत
7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार
8. माधवी समीर सरदेशमुख
9. बाळासाहेब जालिंदर बेलदार
10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार
11. आण्णासाहेब दादू चव्हाण
12. गोपीचंद्र मुरलीधर कदम
13. बापू गोपीनाथराव पवार
14. महेश विश्वास आव्हाड
15. वैदही मनोज रानडे
16. विवेक बन्सी गायकवाड
17. नंदिनी मिलिंद आवाडे
18. वर्षा मुकुंद लड्डा
19. मंगेश हिरामन जोशी
20. अनिता निखील मेश्राम
21. गितांजली श्रीराम बाविस्कर
22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे
23. अर्जुन किसनराव चिखले