मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 20, नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. महायुतीचे बहुतांश उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अजित पवार गट, शिंदे गट व भाजपची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर मनसे पक्षाची देखील यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडीमध्ये फॉर्म्युला समोर न येता ठाकरे गटाने थेट यादी जाहीर केली आहे.
आज राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. गुरुपुष्यामृत योग साधून अनेक बडे नेते शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. वरळीत आदित्य ठाकरेंची अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य मिरवणूक काढली तर स्वत: स्कूटी चालवत यशोमती ठाकुरांची बाईक रॅली काढण्यात आली. जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि रोहित पाटलानीही शक्तिप्रदर्शन केले. तर शंकरबाबा मठात दर्शन घेऊन चंद्रकांत पाटलांची आगेकूच केली आहे. धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंकडून औक्षण करण्यात आले, संजय बांगर, राधाकृष्ण विखे पाटील, किरण सामंत यांनीही अर्ज भरले आहे.
उमेदवारी अर्ज कुणी कुणी भरले?
महाविकास आघाडीच्या या उमेदवारांनी भरले अर्ज
छगन भुजबळ
अद्वय हिरे
रोहित पाटील
हर्षवर्धन पाटील
राजन विचारे
जितेंद्र आव्हाड
वसंत गीते
आदित्य ठाकरे
वैभव नाईक
जयंत पाटील
राणी लंके
राजेश टोपे
यशोमती ठाकूर
भास्कर जाधव
महायुतीच्या या उमेदवारांनी भरले अर्ज
संतोष बांगर
धनंजय मुंडे
अर्जुन खोतकर
सुलभा गायकवाड
किरण सामंत
अतुल भातखळकर
मंगलप्रभात लोढा
अमित साटम
मिहिर कोटेचा
कालिदास कोळंबकर
पराग अळवणी
विक्रम सावंत
सुधीर गाडगीळ
सुरेश खाडे
सुहास बाबर
योगेश कदम
बंटी भांगडिया
विनोद अग्रवाल
संजय राठोड
समरजीत घाटगे
दिलिप वळसे पाटील
राधाकृष्ण विखे पाटील
हीरामण खोसकर
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवळ
प्रशांत बंब
सुभाष देशमुख
अमल महाडिक
राजेंद्र पाटील यड्रावकर
संग्राम थोपटे
अनिल पाटील
चंद्रकांत पाटील
मनसेच्या या उमेदवारांनी भरले अर्ज
अविनाश जाधव
राजू पाटील
याअपक्ष उमेदवारांनी भरले अर्ज
भागिरथ भालके
रणजीत शिंदे