उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय ; आदित्य ठाकरेंवर सोपवली मोठी जबाबदारी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय ; आदित्य ठाकरेंवर सोपवली मोठी जबाबदारी
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. राज्यात महायुतीला २३० जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल. यामुळे राज्यात महायुतीचे सरकार येण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

दरम्यान राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  महाविकासआघाडीचा विधानसभेत मोठा पराभव झाल्याने आता ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांना एक मोठी संधी पक्षाकडून देण्यात आली आहे.

सध्या महाविकासआघाडीच्या गोटात मोठ्या हालचाली घडत आहेत. सध्या सर्वच पक्षांच्या विजयी आमदारांच्या बैठका आणि चर्चा सत्र सुरु आहेत. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाची एक बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरे गटाचे नवनियुक्त आमदार उपस्थितीत होते. उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

महाविकासाआघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने निवडणुकीच्या निकालानंतर एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आदित्य ठाकरे यांची ठाकरे गटाच्या विधिमंडळाचे गटनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच सुनील प्रभू यांची पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या प्रतोदपती नियुक्ती करण्यात आली आहे.

यामुळे आता शिवसेना पक्षात भास्कर जाधव यांचा शब्द अंतिम असणार आहे. तर सभागृहातील आमदारांसाठी आदित्य ठाकरेंचा शब्द शिवसेना आमदारांसाठी अंतिम असणार आहे. यासह प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group