दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केली होती. यानंतर दिशा सालियन प्रकरणासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप झाले.
याचदरम्यान आता आदित्य ठाकरे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असा दावा किशोर तिवारी यांनी केला आहे. किशोर तिवारी हे आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. काही दिवसांपूर्वीच किशोर तिवारी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीवेळी ठाकरेंसोबत होते.
दिशा सालियन हिने आत्महत्या केली नाही, त्यांचा जीव घेतला गेला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा दावा राणे यांनी केला होता. आता किशोर तिवारी यांनी याप्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेव्हा इच्छा होईल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल, असे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.