ठरलं एकदाच...! देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ , वाचा
ठरलं एकदाच...! देवेंद्र फडणवीसांसोबत आज कोण घेणार शपथ , वाचा
img
Dipali Ghadwaje
ठाणे :  विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर जवळपास 14 दिवसांनी शाही शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. या नेतृत्वातील सरकारच्या शपथविधीस काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मंत्रिमंडळावर सस्पेन्स कायम असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

आज देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत कोण शपथ घेणार, याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर आज महायुती सरकारचा शाही शपथविधी सोहळा होणार आहे.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, महायुतीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शपथविधीमध्ये कॅबिनेट मंत्र्यांचाही शपथविधी पार पाडावा अशी देखील काही आमदारांची इच्छा आहे. मात्र, या आमदारांची इच्छा अपूर्ण राहण्याची चिन्ह आहेत.

आज कोण घेणार शपथ?

आजच्या शाही शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेणार आहेत. या तिघांशिवाय इतर कोणाचाही मंत्री म्हणून शपथविधी पार पडणार नाही. त्यामुळे इतर आमदारांचा मंत्री म्हणून शपथविधी हा राजभवनात पार पडणार आहे. राजभवनात 7 डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group