भाजपचे टेन्शन वाढणार : रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या चर्चांना उधाण
भाजपचे टेन्शन वाढणार : रणजितसिंह मोहिते पाटील भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या चर्चांना उधाण
img
Dipali Ghadwaje
भाजपचे विधानपरिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. माढा विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत त्यांनी चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. जर महाविकास आघाडीमध्ये माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विचार होऊ शकतो. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सध्या मोठा फायदा होताना दिसत आहे. कोल्हापूरपाठोपाठ आता महाविकास आघाडीने सोलापूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांसोबत गेल्यानंतर तिथे पाटील रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसोबत राहणं पसंद केलं भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार झाले. पण आता रणजितसिंह मोहिते पाटील हे  काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचे टेन्शन वाढणार आहे.  

रविवारी अकलूजमध्ये काँग्रेसची सभा झाली होती. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूजमध्ये महाविकास आघाडीने शक्ती प्रदर्शन केले होते. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या मेळाव्याच्या निमित्ताने अकलूजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रणजितसिंह मोहिते पाटील दिसले होते. 

यावेळी भाषण करताना 'सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी जी तडजोड करता येईल ती मी करायला तयार आहे.', असं ते बोलले. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील परिवार हे पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूने आल्याची चर्चा आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group